यावर्षीच्या गेल्या आठ महिन्यात मार्च नंतर सर्वाधिक आत्महत्या शेतकरी आत्महत्या झालेला ऑगस्ट हा दुसरा महिना ठरला आहे. या महिन्यात 13 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. जिल्ह्यात आतापर्यंत 64 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून 44 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत.
सततचा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे वाढली आहे. गेल्यावर्षी तर पावसाअभावी खरीप पिके हातची गेली होती. गेल्या मार्च महिन्यात सर्वाधिक 14 शेतकर्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा मार्ग निवडला. त्याखालोखाल जुलै महिन्यात 9 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. फेब्रुवारी 8, जानेवारी 7, मे आणि जून 5 तर एप्रिल महिन्यात तीन शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग पर्याय निवडला होता. गेल्या ऑगस्ट महिन्यात तब्बल 13 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
44 प्रकरणे पात्र!
दरम्यान गेल्या आठ महिन्यात झालेल्या 64 आत्महत्या पैकी शासनाने 44 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरवली आहेत तर 20 प्रकरणे अपात्र ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्याच बरोबर तापर्यंत 44 आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदतीचेही वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.